मॅगी खायलाही एकवेळ तरसणारा क्रिकेटर आज आहे मुंबई इंडियनस्च्या टॉप प्लेअर August 27, 2020 at 03:19PM
पंड्या फॅमिलीचा त्याग:
हार्दिक पांड्याचे वडील हिमांशू यांचा कारचे लोन देण्यासाठीचा छोटा व्ययसाय सुरत शहरात सुरु होता. परंतु हार्दिक आणि कृणालसाठी त्यांनी तो बंद करून वडोदरा येथे स्थलांतरित झाले. जेथे त्यांनी दोघांनाही किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले.
कृणाल आणि हार्दिकने त्यांच्या प्रतिभेचा वापर हा कुटुंबाला मदत करण्यासाठी केला. जवळच्या खेडयात होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा हे खेळाडू अगदी ४००-५०० रुपयांसाठी खेळत.
” काही स्पर्धांना नावे नसत. या स्पर्धा आम्ही खेड्यात खेळत असे. मी काही स्पर्धा जांबूजा ११ सारख्या संघासाठी खेळलो आहे. मला ४०० तर भावाला ५०० रुपये मिळत असत. १ आठवडा तरी सगळं सुखात जायचं. ” हार्दिकने जानेवारी २०१६ ला क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना हार्दिक म्हणाला होता, ” इंडियन प्रीमियर लीग २०१५ पूर्वी मला कुणीही ओळखत नव्हतं. मला तेव्हा लिलावात १० लाख रुपये मिळाले. जर मला लोक ओळखत असते तर नक्कीच जास्त रुपये मिळाले असते. मी एका संघर्ष करणाऱ्या कुटुंबातून आलो आहे. त्याचमुळे आज मी इथे उभा आहे. ”
हार्दिकने भारताकडून ११ कसोटीत ५३२ धावा व १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. वनडेत त्याने ५४ सामन्यात ९५७ धावा व ५४ विकेट्स घेतल्या आहेत. टी२०मध्ये ४० सामन्यात ३१० धावा व ३८ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने ६६ सामन्यात १०६८ धावा व ४२ विकेट्स घेतल्या आहे.
हार्दिक प्रमाणेच हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्यानेही भारताकडून १८ टी२० सामन्यात ९ डावात फलंदाजी करताना ४ वेळा नाबाद रहात १२१ धावा व १४ विकेट्स घेतल्या आहे.
आजचा ट्रेंडिंग लेख- अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती
www.mahasports.in
from क्रिकेट – Maha Sports https://ift.tt/2YApmcU
https://ift.tt/eA8V8J
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not send any spam comments.