Breaking News

ज्या गोष्टींसाठी विराटने घेतली मेहनत, आता म्हणतोय त्याच गोष्टी नाही ठेवणार घरात August 28, 2020 at 11:23AM

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही पुढील वर्षी आई- वडील होणार आहेत. ही आनंदाची बातमी विराटने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरून एक फोटो शेअर करत दिली आहे. विराटने जो फोटो शेअर केला त्यामध्ये अनुष्का बेबी बंपसह दिसत आहे.

१० डिसेंबर २०१७ रोजी भारताच्या या कर्णधाराने जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले होते. त्यांचे लग्न झाल्यापासूनच चाहत्यांना या बातमीची उत्सुकता लागली होती. विराट वडील बनल्यानंतर मोठा त्याग करणार आहे. २ वर्षांपूर्वी विराटने म्हटले होते की, वडील बनल्यानंतर तो आपल्या घरातील सर्व ट्रॉफी, बक्षिसे हे सर्व पॅक करून ठेवेल.

घरात ठेवणार नाही आपली कोणतीही ट्रॉफी

विराट कोहलीने २०१८मध्ये आपल्या वडील बनण्याच्या बाबतीत चर्चा केली होती. तो म्हणाला होता की, त्याला नाही माहिती की तो वडील केव्हा बनणार आहे. परंतु त्याला हे नक्की माहीत आहे की तो वडील बनल्यानंतर काय करणार आहे.

विराटने ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “मला माहिती आहे की नेहमीच सर्वकाही एकसारखे राहणार नाही. माझंही स्वत:चं आयुष्य आहे, कुटुंब आहे. माझीही मुलं असतील आणि त्यांना माझ्यासोबत वेळ घालविण्याचा पूर्ण अधिकार असेल. एक गोष्ट जी माझ्या डोक्यात स्पष्ट आहे की, जेव्हा माझी मुलं असतील, तेव्हा मी कारकिर्दीशी निगडीत कोणत्याही वस्तू घरात नसतील. मी आपल्या सर्व ट्रॉफी, मी मिळविलेली सर्व बक्षिसे पॅक करून ठेवेल. माझी अशी इच्छा आहे की माझी मुलं जेव्हा मोठी होतील, तेव्हा त्यांना सेलिब्रिटीच्या घरात राहिल्यासारखे वाटू नये.”

काही काळापासून येत होत्या अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या

मागील काही काळापासून अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. अनुष्काला मुंबईच्या एका दवाखान्याबाहेर पाहण्यात आले होते, त्यानंतर अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधान आले होते. शेवटी विराटने स्वत:च याबाबत घोषणा केली आहे.

नुकतेच भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर सांगितले होते की, त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविचने मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी विराटलाही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती की, तो केव्हा आनंदाची बातमी (वडील बनण्याची बातमी) देणार आहे.

विराट सध्या आहे यूएईत

विराटने लॉकडाऊनदरम्यान अनुष्का शर्मासोबत आपल्या घरीच वेळ घालविला होता. अनुष्का मागील काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. तिने निर्मात्याच्या भूमिकेत एक वेब सीरिज रीलिझ केली आहे. परंतु स्वत: झिरो चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. दुसरीकडे विराट कोहली मात्र सध्या आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी यूएईला पोहोचला आहे. तो आपल्या संघासोबत न जाता मुंबईतून चार्टर्ड विमानाने दुबईला पोहोचला होता.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून होणार आहे, तर यातील अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या यूएईतील कोरोनाची परिस्थिती, आतापर्यंत झालाय इतक्या लोकांचा मृत्यू

-खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने दिले हे वचन

-राजस्थान रॉयल्सचा संघ दुबईत रात्री करतोय सराव; जाणून घ्या काय आहे कारण

ट्रेंडिंग लेख-

-वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

-कसोटीत विक्रमांचा रतीब घालणाऱ्या ‘या’ ३ दिग्गजांना कधीही मिळाली नाही आयपीएलमध्ये संधी

-वेस्ट इंडिजच्या या ३ स्टार खेळाडूंच्या नशिबी आला फक्त एक आयपीएल हंगाम

www.mahasports.in



from क्रिकेट – Maha Sports https://ift.tt/2YID0e1
https://ift.tt/30OhO81

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not send any spam comments.