विराट यंदा सनराइजर्स हैद्रबादकडून शानदार कामगिरी करण्यास सज्ज; तर ‘या’ ४ खेळाडूंवरही असेल सर्वांचे लक्ष August 28, 2020 at 12:00PM
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आयपीएलच्या तेराव्या हंगामातील त्या ५ दमदार युवा भारतीय खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांच्या प्रदर्शावर सर्वांचे लक्ष असेल. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व खेळाडूंनी अद्याप तरी भारतीय संघात पदार्पण केलेले नाही. पण, देशांतर्गत क्रिकेटप्रमाणे हे खेळाडू आयपीएलमध्येही दमदार प्रदर्शन करु शकतात. Aakash Chopra Picked 5 Indian Youngsters To Watch Out Of This IPL
चोप्राने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओत ही माहिती दिली आहे. त्याने सर्वप्रथम १९ वर्षांखालील भारतीय संघातील स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालची निवड केली. तो आयपीएल २०२०मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसेल. जयस्वालबद्दल बोलताना चोप्रा म्हणाला की, “मी राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालपासून सुरुवात करत आहे. माझ्या मते राजस्थान संघ त्याच्याकडून सलामीला फलंदाजी करवेल. जयस्वाल नक्कीच जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन करेल. त्याच्या आत्मविश्वासाला पाहून असे वाटत आहे की, तो या मोठ्या शर्यतीत लांबपर्यंत टिकणारा खेळाडू ठरेल.”
दूसऱ्या क्रमांकावर चोप्राने रवि बिश्नोईची निवड केली. २०१९ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात त्याने शानदार प्रदर्शन केले होते. तो यंदा आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग आहे. “दूसऱ्या क्रमांकावर मी किंग्स इलेव्हन पंजाबच्या रवि बिश्नोईची निवड केली आहे. तो यंदा अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली खेळेल. त्यामुळे तो शानदार प्रदर्शन करेल. त्याच्यामध्ये गुगली चेंडू टाकण्याची चांगली शैली उपलब्ध आहे. सोबतच तो खूप ढिला चेंडू टाकू शकतो. तसेच, मोठ्या मैदानावर खेळल्यामुळे त्याला बराच फायदादेखील होणार आहे,” असे बिश्नोईविषयी बोलताना चोप्राने सांगितले.
चोप्राने तिसऱ्या क्रमांकावर सनराइजर्स हैद्राबाद संघाच्या विराट सिंगची निवड केली आहे. त्याच्याविषयी बोलताना चोप्रा म्हणाला की, “तिसरा खेळाडू जो मी निवडला आहे, तो म्हणजे विराट सिंग. तो व्हिव्हिएस लक्ष्मणच्या प्रशिक्षणाखाली खेळणार आहे. झारखंडच्या या खेळाडूकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. सनराइजर्स संघाला अशा फलंदाजाची नक्कीच गरज भासणार आहे, जो खालच्या फळीत आक्रमक फलंदाजी करेल. त्यासाठी त्यांच्याकडे विराटचा पर्याय उपलब्ध असेल.”
“राजस्थान रॉयल्स संघाचा रियान पराग हा न घाबरता फलंदाजी करतो आणि त्याच्यामध्ये कशाही दबावाच्या परिस्थितीत चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल हा संधी मिळाल्यावर जबरदस्त प्रदर्शन करणारा खेळाडू आहे. त्यामुळे मी या दोघांची निवड केली आहे,” असे शेवटी बोलताना चोप्राने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या गोष्टींसाठी विराटने घेतली मेहनत, आता म्हणतोय त्याच गोष्टी नाही ठेवणार घरात
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची चिंता मिटली; संघांना मिळाले प्रायोजक
मला कोणतीही जबाबदारी द्या मी ती शंभर टक्के पूर्ण करतो – अजिंक्य रहाणे
ट्रेंडिंग लेख –
एमएस धोनीचे आयपीएलमधील ३ शानदार विक्रम, ज्यांच्या आसपासही नाही कुणी
वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी
कसोटीत विक्रमांचा रतीब घालणाऱ्या ‘या’ ३ दिग्गजांना कधीही मिळाली नाही आयपीएलमध्ये संधी
www.mahasports.in
from क्रिकेट – Maha Sports https://ift.tt/3gD1AmE
https://ift.tt/eA8V8J
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not send any spam comments.